Saturday, July 27, 2024

/

लिव्हर ट्रान्सप्लान्टसाठी १२ तासात ४० हजार रुपयांची मदत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी स्वतःला मिळालेली पुरस्काराची १० हजार रुपयांची मदत सुळकुडे कुटुंबाला दिली आणि यानंतर सुळकुडे कुटुंबातील बाजीराव सुळकुडे यांच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी ४० हजार रुपयांची मदत सुळकुडे कुटुंबाकडे जमा केली आहे.

सोशल मीडियासह विविध प्रसारमाध्यमांवर झळकलेल्या संतोष दरेकर यांच्या बातमीनंतर सुळकुडे कुटुंबाकडे देणग्यांचा ओघ सुरु झाला असून सुळकुडे कुटुंबीयांनी याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. सुळकुडे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असून या कुटुंबातील बाजीराव सुळकुडे यांच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

यासंदर्भात माहिती मिळताच संतोष दरेकर यांनी त्यांना मिळालेली १० हजार रुपयांची रक्कम सुळकुडे यांना देऊ केली.

अवघ्या १२ तासात बेळगांव व परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी ४० हजार रुपये खात्यावर पाठविले असून आणखीन ८.५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक मदतीसाठी :
फेडरल बँक खाते क्रमांक : 19390100033095,
आयएफएससी कोड : एफडीआरएल 0001939 या बँक खाते क्रमांकाचा वापर करावा. अधिक माहितीसाठी 9632731806 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.