बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने ११ जूनपासून पाच हमी योजनेपैकी एक असलेली शक्ती योजना लागू केली असून या अंतर्गत महिलांना संपूर्ण राज्यभरात मोफत बसप्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रविवारी या योज़नेची अंमलबजावणी करण्यात आली असून पहिल्याच दिवशी राज्यभरातील तब्बल ५.७१ लाख महिलांनी मोफत बससेवेचा लाभ घेतला आहे.
कर्नाटकात चार परिवहन मंडळांच्या अंतर्गत या बससेवेचा लाभ पुरविण्यात आला असून रविवारी केएसआरटीसी, बीएमटीसी, वायव्य परिवहन आणि कल्याण कर्नाटक परिवहन अंतर्गत ५,७१,०२३ महिलांनी मोफत बससेवेचा लाभ घेतला.
केएसआरटीसी अंतर्गत १,९३,८३१, बीएमटीसी अंतर्गत २,०१,२१५, वायव्य परिवहन अंतर्गत १,२२,३५४ आणि कल्याण कर्नाटक परिवहन अंतर्गत ५३,६२३ महिलांनी प्रवास केला आहे.
परिवहन बसमध्ये प्रवास करणाऱ्या ५.७१ लाख महिलांच्या मोफत बसप्रवासाचे एकूण तिकीट मूल्य १,४०,२२,८७८ रुपये इतके झाले आहे.