Wednesday, December 4, 2024

/

वीज बिलातील एक रहस्यमय घटक एफएसी, अन् त्याचा ‘हा’ उलगडा

 belgaum

विजेच्या निश्चित दरात नुकतीच झालेली वाढ आणि इंधन खर्च समायोजन शुल्क (एफएसी) किंवा इंधन व ऊर्जा खरेदी खर्च समायोजन शुल्क (एफपीपीसीए) यांचा विजेच्या बिलातील अंतर्भाव ग्राहकांना धक्का देणारा ठरला आहे.

आपल्या बाबतीत सांगायचे झाल्यास हेस्कॉमने बेळगावमध्ये या बदलाची अंमलबजावणी केली आहे. परिणामी मे महिन्यातील विजेच्या बिलांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, म्हणजे एफएसी सरासरी प्रति युनिट 0.57 पैशावरून तब्बल 2.55 रुपये इतका वाढविण्यात आला आहे.

प्रथम हे समजून घेतले पाहिजे की ऊर्जा शुल्क हा बिलाचा प्राथमिक घटक आहे. ज्यामध्ये इंधन दर, निर्मिती व प्रसारण, वितरण शुल्क आणि जनरेटरचा फायदा यांचा समावेश असतो. हे दर कर्नाटकमध्ये कर्नाटक वीज नियामक आयोग (केईआरसी) निश्चित करत असतो.

ग्राहकांना दर आकारण्यापूर्वी वीज वितरक विविध स्तरांच्या आधारावर किती ऊर्जा शुल्क आकाराचे याची मोजणी करतात. ऊर्जा शुल्का बरोबरच ग्राहकाला सेवा शुल्काप्रमाणे असलेला विजेचा निश्चित दर देखील अदा करावा लागतो. हा दर व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांसाठी त्यांच्या वीज वापरानुसार ठरवलेला असतो. एलटी2 श्रेणीतील ग्राहक मोठ्या प्रमाणात वीज वापरत असल्यामुळे त्यांच्यासाठी विजेचा निश्चित दर देखील जास्त असतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळसा आणि नैसर्गिक वायू सारख्या इंधनाच्या दरात चढ -उतार होत असतो. त्यावेळी त्यानुसार केईआरसी आपल्या ऊर्जा दर पत्रकात सुधारणा करत असते.

या दरालाच ‘एफएसी’ अर्थात इंधन समायोजन शुल्क म्हंटले जाते. जे ऊर्जा शुल्कात जोडले जाते आणि ज्यामध्ये इंधनाच्या दरानुसार दरमहा बदल होत असतो. तेंव्हा या दराच्या बाबतीत ग्राहकांनी नेहमीच जागरूक असणे महत्त्वाचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.