Wednesday, January 15, 2025

/

तब्बल 4.5 टनाने वाढले जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन

 belgaum

गेल्या पाच वर्षांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन 4651 टनाने वाढले असून गत वर्षभरात बेळगाव जिल्ह्याने 7890 टन मत्स्य उत्पादन घेतले आहे. त्यामुळे आता मत्स्य खात्याने नदी, नाले आणि तलावात मत्स्य पिले सोडण्याची तयारी सुरू केली आहे.

अलीकडच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आपल्या शेतात शेततळे, मत्स्य तळे मंजूर करून घेण्यासह त्यामध्ये तसेच तलाव, नदी, कालवे यात मत्स्य उत्पादन घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मत्स्य उत्पादनासाठी जिल्ह्यात 1845 शेततळी आणि 324 तलावांची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामध्ये सध्या मत्स्य उत्पादन घेतले जात आहे.

हिडकल व सौंदत्ती येथील मत्स्य उत्पादन केंद्रातून 58 लाख मत्स्यबीज पुरवठा केला जात असून पिले खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी कट्टा, राहू, मैगल व सामान्य गेंड माशांच्या पिल्यावर भर देण्यात येणार आहे. मत्स्य खात्याच्या कार्यक्षेत्रात 221 तलाव असून त्यापैकी 160 तलावात तसेच हिडकल, नवलतीर्थ जलाशय घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा, मार्कंडेय नदीमध्ये मत्स्य पिले सोडली जातात.

मत्स्य खात्याच्या 160 तलावांमध्ये सध्या 5460 टन मासे उत्पादन होत असून कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीतील मत्स्य उत्पादनाचे प्रमाण 300 टन आहे. त्याचप्रमाणे शेततळ्यातील मासे उत्पादनाचे प्रमाण 1240 टन आहे या खेरीज 70,000 हेक्टर प्रदेशातील जलाशयात 1500 टन मत्स्य उत्पादन केले जात आहे. मत्स्य उत्पादनातील ही प्रगती लक्षात घेता पुढील 10 वर्षात बेळगाव जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन 1 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.