Sunday, September 1, 2024

/

प्रचंड गर्दीत गाजली मनपा प्रगती आढावा बैठक..

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर आज शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत प्रगती आढावा बैठक बोलाविण्यात आली होती.

हि बैठक शहरातील विविध समस्यांच्या विषयांवरून मोठ्या गर्दीत गाजली. महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक – नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत अधिकारी वर्गाला अल्टिमेटम दिला आहे.

या बैठकीत प्रामुख्याने स्मार्ट सिटी योजनेच्या कामकाजात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला झालेल्या गर्दीने पालिका सभागृह खाचखच्च भरले होते. यावेळी उपस्थितांनी आपापल्या प्रभागातील स्मार्ट सिटी योजनेतील त्रुटी, गटारी, पाणी, रस्ते अशा अनेक तक्रारी मांडल्या.

यावेळी सतीश जारकीहोळी यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना रखडलेली कामे पूर्ववत सुरु करण्यासाठी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला असून जे अधिकारी गेली कित्येक वर्षे बेळगावमध्ये जम बसवून आहेत त्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा इशाराही दिला.

याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर सर्कल येथे १ कोटी रुपयांच्या खर्चातून शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मागील कालावधीत वर्क ऑर्डर देण्यात आली असून महिन्याभरात तातडीने या कामकाजाची सुरुवात करावी, अशी सूचनाही सतीश जारकीहोळी यांनी दिली.Satish jarkiholi

या बैठकीत प्रामुख्याने मूलभूत असुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. या सूचना लक्षात घेत सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत २०१३- २०१७ या कालावधीत भाजप कार्यकाळात रखडलेली कामे पूर्ववत सुरु करण्याची सूचना केली आहे.

याचप्रमाणे माफक दरात इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून अन्नपदार्थ पुरविण्याची योजनाही आखण्यात आली होती. मात्र इंदिरा कँटीन बंद अवस्थेत दिसून येत असल्याने सदर कँटीन सेवा पूर्ववत करण्यासाठी लवकरच पाहणी करणार असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.