बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या रहिवासी एनिड जॉन यांनी अलीकडेच दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया डायडेम लेगसी स्पर्धेत प्रथम उपविजेतेपदाचा किताब पटकाविला आहे.
जॉन यांनी सेंट झेवियर्स येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले असून लिंगराज महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.
मिसेस इंडिया डायडेम लेगसी स्पर्धेत प्रथम उपविजेते पदाचा बहुमान मिळविलेल्या एनिड जॉन यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे
एनिड जॉन यांनी आजपर्यंत शिक्षक, समुपदेशक, सौंदर्य विशेषज्ञ आणि थीम केक अशा अनेक क्षेत्रात कामगिरी केली आहे. एनिड जॉन यांना दोन अपत्ये असून रॅम्पवर वॉक करण्याचे त्यांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न होते.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिद्द आणि या क्षेत्राप्रती प्रामाणिकपणे काम करत यश गाठले आहे. एनिड जॉन यांचा या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आव्हानात्मक होता, त्यासाठी एकाग्रता आणि प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत दृढनिश्चयाने हे यश गाठले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.