Tuesday, September 17, 2024

/

“दडपण” मधून आत्महत्या रोखण्याचा सामाजिक संदेश -संतोष सुतार

 belgaum

बेळगावच्या अस्मिता क्रिएशन्सने तयार केलेल्या “दडपण” या मराठी चित्रपटाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रकारांना आळा बसावा हा आहे. “आता विराम आत्महत्येला” या टॅगलाईनचा हा सामाजिक संदेश देणारा चित्रपट लवकरच बेळगावात प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक -दिग्दर्शक संतोष सुतार यांनी दिली.

बेळगावातील कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलेल्या “दडपण” चित्रपटाबद्दल माहिती देताना संतोष सुतार म्हणाले की, मला लहानपणापासून वाचन आणि लिखाणाची आवड आहे. त्यामुळे बरेच मुद्दे डोळ्यासमोर येतात, जे आपण दुर्लक्षित करू शकत नाही.

लोकांना होणारा त्रास पहावत नाही. कांही मुद्दे जवळून अनुभवल्यामुळे वाटतं की असं होऊ नये. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या आत्महत्ये संदर्भातील दडपण या चित्रपटाची कथा माझ्या हातून साकारली. मुलांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत हा सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे.

मुलांच्या आत्महत्या मागील मुख्य कारण मनावरील दडपण हे असतं. मात्र मनावरील दडपण दूर करण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नव्हे हे स्पष्ट करणारा हा चित्रपट आहे. तसेच फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठी तयार केलेला हा चित्रपट आहे. मुलांनी पालकांच्या मनाचा आणि पालकांनी मुलांच्या मनाचा विचार करावा आणि दडपण झुगारून आत्महत्येला विराम द्यावा, हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही “दडपण” या चित्रपटातून केला आहे.Dadpan

त्यामुळे हा चित्रपट फक्त विद्यार्थी म्हणजे मुलांसाठी नसून पालकांसाठी देखील आहे, असे लेखक -दिग्दर्शक संतोष सुतार यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे दडपण चित्रपट लवकरच शहरातील ग्लोब किंवा प्रकाश चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार आणि मुख्य बालकलाकार वेदांत तसेच अन्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.