बेळगाव शहराच्या सौंदर्यात भर पाडणारा भुईकोट किल्ल्याची तटबंदी कोसळू लागल्याने इतिहास पुसू लागला आहे. त्यामुळे या किल्ल्याचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
बेळगाव शहराच्या या भुईकोट किल्ल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. महत्वपूर्ण असणारा हा भुईकोट किल्ला दिवसेंदिवस रहास पावत चालला आहे .अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढल्यामुळे दगड निखळत चालले आहेत. त्यामुळे बरेच ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करता अशा महत्त्वपूर्ण आणि अभेध्य असणारा किल्ला जर काळाच्या ओघात नष्ट झाला तर ही ऐतिहासिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात हानी आहे. एकंदर पुरातत्व खाते आणि गड संवर्धन प्रेमी लोकांनी व स्थानिक प्रशासन या सर्वांनी याबाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे, कारण जर या किल्ल्याची हानी झाली तर इतिहास पुसला जाण्याची शक्यता असते, तर अशा पद्धतीने मजबूत असणारा हा किल्ला काही ठिकाणी ढासळू लागला आहे त्या ठिकाणची त्वरित डागडुजी करण्याची गरज आहे.
निजामशाही, आदिलशाही, मोगल, शिवशाही त्याचबरोबर जैनबस्ती या सर्वांचा इतिहास या किल्ल्याशी निगडित आहे .या किल्ल्याने अनेक लढाया बघितलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक सत्तांतरेही पाहिलेली आहेत .
ब्रिटिश काळातील हा किल्ला महत्त्वपूर्ण होता त्याचबरोबर आता इथे भारतीय सेनेचे केंद्र आहे आणि हा किल्ला सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या म्हणजेच संरक्षण खात्याच्या अत्याचारित येतो .या सर्व लोकांनी विचार करून या किल्ल्याच्या साठी आणि एकंदर ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असणारा हा किल्ला वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.