Sunday, September 1, 2024

/

सावित्रीच्या आधुनिक लेकी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : एक पुराण काळातील सत्यवानाचा आपल्या बुद्धी व चातुर्याने मृत्युच्या पाशातून जीव वाचवणारी सावित्री आणि एक स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देऊन त्यांचा उद्धार करणारी सावित्री आम्हांला दोघीही श्रेष्ठ आहेत, असे सांगत याच अनुषंगातून मच्छे गावातील म. ए. समितीच्या सामाजिक कार्यकर्त्यानी आदर्श उपक्रम हाती घेतला.

सौ.रेणुका भोमानी लाड, रमा शाम बेळगावकर, प्रियांका बजरंग धामणेकर, शारदा परशराम कणबरकर, वीणा गजानन छप्रे, मालती मालोजी लाड, रेखा जयपाल लाड यांनी वटपौर्णिमा पूजनाच्या जागी जो फळरूपी प्रसाद ठेवला जातो तो सर्व संकलित करून तो भुकेलेल्या बालकांना आणि अनाथ व्यक्तींना वितरित केला वेगळेपण होत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सावित्रीच्या लेकी म्हणून सावित्रीचा वसा वसा व वारसा जप्त अन्न हें पूर्ण परब्रम्ह मानून ते भुकेल्यांच्या पोटात पडावे, भगवंताचा प्रसाद भुकेल्यांची भूक भागवून तो सत्कर्मी लागावा. त्या प्रसादाची विटंबना होऊ नये हा उद्देश मनी धरून आधुनिक सावित्रीचे कार्य पार पाडले.Womens. Vat pournima

या कार्यासाठी त्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत अथक कार्य केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे आणि सत्कारणी कार्यामुळे भुकेल्यांना अन्न मिळाले आणि आजच्या पौर्णिमेचा वसाही सत्कारणी लागला. आधुनिक सावित्री म्हणून केलेल्या त्यांच्या या कार्याचे आज सर्वत्रच कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.