Tuesday, June 25, 2024

/

बेळगाव शेतकरी संघटनेतर्फे ‘या’ मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याच्या सफाईची मागणी करत आज बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

बळ्ळारी आणि लेंडी नाल्याची स्वच्छता न केल्यामुळे आसपास परिसरात असलेल्या शेतशिवाराचे मोठे नुकसान होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही नाल्याची वेळेत साफसफाई होत नसल्याने कचरा आणि गाळ मोठ्या प्रमाणात साच्यो. पावसाला सुरुवात झाल्यानंतर कचऱ्यामुळे दोन्ही नाल्याचे पाणी शेतशिवारात घुसते आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसतो.

केवळ शेती आणि शेतकरीच नाही तर बळ्ळारी नाल्यातील पाणी वाहून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही यामुळे समस्या निर्माण होत आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी या नाल्यामुळे शहरात मोठी समस्या निर्माण झाली होती. यंदा पाऊस लांबला आहे. मात्र काही दिवसात पावसाला सुरुवात होईल, आणि यानंतर पुन्हा या नाल्यांमुळे समस्या निर्माण होतील. याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेदेखील पाईपलाईन टाकली आहे.Farmers

 belgaum

मात्र या पाइपलाइनमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दिसून आले आहे. मुचंडी गावानजीक रेल्वे लाईन नजीक खडकाळ भागातील कचरा याठिकाणी येऊन साचतो. यामुळे सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडते.

हि बाब लक्षात घेऊन सदर समस्येवर गांभीर्याने विचार करून त्वरित हि समस्या सोडवावी, अशा आशयाचे निवेदन आज देण्यात आले. यावेळी बेळगाव शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.