Sunday, June 16, 2024

/

एपीएमसी मार्केट पूर्ववत सुरू केले जाईल -मंत्री पाटील

 belgaum

शेतकरी विरोधी तीनही कायदे मागे घेण्याबरोबरच एपीएमसी बाजारपेठ पुन्हा पुर्ववत सुरू केली जाईल, असे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, ऊस विकास व साखर संचलनालयासह कृषी व्यापार खात्याचे मंत्री शिवानंद पाटील यांनी दिले आहे.

बेळगाव दौऱ्यावर असलेले मंत्री शिवानंद पाटील यांनी आज बुधवारी बेळगाव एपीएमसी मार्केट यार्डला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना येत्या अधिवेशनात शेतकरी विरोधी तीनही कायदे सरकार मागे घेईल.

त्यानंतर बेळगाव एपीएमसी मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एपीएमसी बाजारपेठ पुन्हा सुरू केली जाईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.Apmc news

 belgaum

प्रारंभी एपीएमसी कार्यालयात मंत्री महोदयांचे शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आजच्या आपल्या भेटीप्रसंगी मंत्री शिवानंद पाटील यांनी एपीएमसी मार्केट यार्डचा पाहणी दौरा केला आणि यार्डाची अवस्था पाहून खेद व्यक्त केला.

याप्रसंगी त्यांच्या समवेत एपीएमसी सेक्रेटरी के. एस. गुरूप्रसाद, भाजी मार्केट संघटनेचे उपाध्यक्ष बसनगौडा पाटील, व्यापारी सतीश पाटील, मोसिन धारवाडकर, सदानंद पाटील, संदीप अंबोजी, जावेद सनदी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.