Thursday, December 26, 2024

/

‘अग्निवीर’साठी भरती सुरु

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ‘अग्निवीर’सैन्य भरती प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. सेंटरतर्फे आजी आणि माजी सैनिकांच्या मुलांसाठी युनिट मुख्यालय राखीव कोटांतर्गत ही भरती होत आहे.

यात अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी), अग्निवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल या जागा भरल्या जाणार आहेत.

आज महाराष्ट्रातील अहमदनगर, जालना, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई शहर, मुंबई सबअर्बन भागातील उमेदवारांसाठी जीडी भरती होईल.

तर बेळगावसह कर्नाटकातील उमेदवारांसाठी २८ जूनला भरती असेल. याच दिवशी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश राज्यातील उमेदवारांसाठीही भरती प्रक्रिया चालणार आहे.

३० जूनपर्यंत मराठा इन्फंट्रीमध्ये ही भरती प्रक्रिया चालणार असून यात मराठा इन्फंट्रीतर्फे जाहीर करण्यात आलेला तारखेनुसार कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध
जिल्ह्यातील उमेदवारांचे भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

युद्धात शहीद झालेल्या जवानांची मुले, तसेच सेवारत जवान व माजी सैनिकांच्या मुलांसाठी ही भरती प्रक्रिया चालणार आहे. पहिल्या दिवशी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या शिवाजी स्टेडियमवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी अग्निवीर जीडी पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली.

पात्र उमेदवारांच्या कागद पडताळणीसह त्यांची शारीरिक चाचणीही घेण्यात आली. उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांना पुढे वैद्यकीय चाचणी होणार असून या भरती प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची सामान्य सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.