Daily Archives: Jun 3, 2023
बातम्या
शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी मुख्य वास्तुविशारद आर. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (3 जून) शहराच्या मध्यभागी असलेल्या शासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज बहुमजली इमारतीच्या बांधकामासंदर्भात...
बातम्या
उद्या ‘या’ भागातील वीजपुरवठा खंडित
बेळगाव लाईव्ह : रविवार दि. ४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
केएचबी कॉलनी, अलारवाड, सुवर्णविधानसौध, शहापूर गाडेमार्ग, बसवेश्वर सर्कल, आचार्य गल्ली, नवी गल्ली, नार्वेकर गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ...
बातम्या
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक
बेळगाव लाईव्ह : गृहलक्ष्मी, युवानिधी, अन्नभाग्य यासह पाच ‘हमी’ लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याची पुरेशी अंमलबजावणी करावी, लाभार्थ्यांची ओळख पटवावी आणि जिल्ह्यातील संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व तयारी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी...
राजकारण
‘असे’ असतील राज्यातील संभाव्य पालकमंत्री
कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर आता राज्यातील जिल्हा पालक मंत्र्यांची नियुक्ती केली जाणार असून विविध जिल्ह्यांचे संभाव्य पालकमंत्री पुढीलप्रमाणे असू शकतात.
बेंगलोर शहर -के. जे. जॉर्ज, बेंगलोर ग्रामीण -रामलिंग रेड्डी, कोलार -के. एच. मुनियप्पा, चिक्कबेळ्ळापूर -डॉ. एम. सी. सुधाकर,...
बातम्या
हवाई दलाच्या 2,675 अग्नीवीरांचा दीक्षांत सोहळा दिमाखात
बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याद्वारे भारतीय हवाई दलात देश सेवेसाठी रुजू होण्यास सज्ज असलेल्या 2,675 इतक्या अग्नीवीर जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला.
सांबरा हवाई दल परेड...
बातम्या
..अन् तिने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस बाळाला जन्म
अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्याने 108 रुग्णवाहिकेतून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत असताना एक महिला रुग्णवाहिकेतच सुखरूप प्रसुत होऊन तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना नुकतीच बेकीनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे घडली.
बेकीनकेरे येथील एका गरोदर महिलेला काल...
बातम्या
सुहासिनींकडून वटपौर्णिमा भक्तीभावाने होतेय साजरी
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात आज शनिवारी सुहासिनी महिलांकडून वटवृक्षांचे पूजन करण्याद्वारे वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जात आहे.
वटपौर्णिमेला आज शनिवारी सकाळी 11:17 वाजता प्रारंभ झाला असून उद्या रविवारी सकाळी 9:11 वाजेपर्यंत पौर्णिमेचा कार्यकाळ असेल. वटवृक्षाच्या पूजेसाठी...
बातम्या
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक जाधव यांचा दिल्ली मुक्कामी सत्कार करण्यात आला. ह.भ.प. शंकर बाबली आणि म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी अभिषेक...
बातम्या
राज्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधिक्षकांच्या बदल्या
बेळगाव लाईव्ह : राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप अधीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे २९२ पोलीस निरीक्षक आणि ५१ पोलीस उप अधीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून बेळगाव जिल्ह्यातील विविध...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...