प्रशिक्षणा दरम्यान रेडबर्ड प्रशिक्षण संस्थेच्या विमानात बिघाड झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करताना ते विमान कोसळून वैमानिकासह अन्य एक जण जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात घडली. दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, बेळगाव विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या रेडबर्ड वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या एका विमानाने आज मंगळवारी सकाळी प्रशिक्षणासाठी हवाई उड्डाण केले होते.
त्यानंतर सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास सांबरा गावाजवळ अवकाशात या छोट्या विमानामध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे मोदगा -बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळ तालुक्याच्या हद्दीत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
हे लँडिंग सुरळीत न विमान शेतात कोसळले. चाके तुटून विमानाचा अपघात झाला आणि या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांसह सांबरा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा अथवा जीवित हानी झाली नाही.
या न्युज देखील वाचा