Friday, April 26, 2024

/

बेळगावात रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन

 belgaum

रेड बर्ड एव्हिएशन फ्लाईंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बेळगाव विमानतळावरील आपल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा (एफटीओ) आज बुधवारपासून अधिकृत शुभारंभ केला आहे. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी या केंद्राचे आभासी उद्घाटन केले.

बेळगाव विमानतळ आवारात आज बुधवारी सकाळी एफटूओ रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे सचिव राजीव बंसल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी आदींच्या उपस्थित केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी प्रशिक्षण केंद्राचे आभासी (व्हर्च्युअली) उद्घाटन केले. त्यानंतर बेळगाव विमानतळाचे संचालक आणि रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीचे अध्यक्ष कॅप्टन करण मन्न यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे औपचारिक उद्घाटन झाले.

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने बेळगाव, कलबुर्गी, जळगाव, खजुराहो आणि लीलाबरी अशा 5 ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भातील निवाडा पत्र गेल्या मे 2021 मध्ये संबंधित एफटूओ एजन्सीजना देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) रचना, बांधा, चालवा, देखभाल आणि हस्तांतरण (डीबीओएमटी) आधारे 25 वर्षाच्या भाडेकरार तत्त्वावर वैमानिक प्रशिक्षण संघटनांना (एफटूओस) 5000 चौरस मीटर जमीन भाड्याने दिली आहे.Red bird flight

 belgaum

यासंबंधीचा करार बेळगाव विमानतळ आणि मेसर्स रेड बर्ड यांच्यात गेल्या 30 जून 2021 रोजी झाला आहे. एएआय कडून या ठिकाणचा 287 मीटर लांबीचा लिंक टॅक्सी ट्रॅक गेल्या 30 जून 2022 रोजी बांधून पूर्ण करण्यात आला. करारानुसार टॅक्सी ट्रॅक हा एएआयने बांधावयाचा होता आणि हँगर व ॲप्रोन मेसर्स रेड बर्डने उभारावयाचे होते. त्यानुसार बेळगाव येथे उभारण्यात आलेले हँगर हे 25 बाय 25 मीटर आकाराचे असून ॲप्रोनचा आकार 50 बाय 50 मीटर इतका आहे.

मेसर्स रेड बर्डने आपल्या विमान उड्डाण प्रशिक्षणाची गेल्या 11 मार्च रोजी केली आहे. त्यांच्याकडून सध्या बेळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षणासाठी तीन विमाने (दोन सिंगल इंजिन टेकनाम 2008 जेसी आणि एक सेसना 172) तैनात करण्यात आली आहेत. रेड बर्डकडून गेल्या 12 ते 28 मार्च 2023 या कालावधीमध्ये म्हणजे 17 दिवसांमध्ये 165 तासाहून अधिक हवाई उड्डाण प्रशिक्षण देण्यात आले आहे. रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी ही नागरी हवाई उड्डाण महासंचलनालयाकडून मान्यताप्राप्त हवाई उड्डाण प्रशिक्षण संघटना आहे.

भारतातील वैमानिक बनू इच्छिणाऱ्यांना प्रगत आणि अत्याधुनिक जेट विमानाच्या तोडीचे दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने 2017 मध्ये रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीची स्थापना झाली. या अकॅडमीला राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि एरोस्पेस अँड एविएशन सेक्टर्स स्किल कौन्सिल ऑफ इंडियाची देखील मान्यता आहे. रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी ही देशातील सर्वात मोठ्या हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.