Friday, April 26, 2024

/

18 जागांसाठी 185 उमेदवारांची आता 10 मे ला कसोटी

 belgaum

गेल्या आठ-दहा दिवसापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सोमवारी सायंकाळी खाली बसणार असून येत्या बुधवारी जिल्ह्यातील एकूण 18 मतदारसंघातील 185 उमेदवारांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे येत्या बुधवार दि. 10 मे रोजी या सर्व उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद होऊन त्यांची कसोटी लागणार आहे.

कर्नाटकच्या सोळाव्या विधानसभेसाठी येत्या बुधवारी 10 मे रोजी मतदान होत आहे. सर्वाधिक मोठा जिल्हा बेळगाव असल्यामुळे या ठिकाणी गेल्या आठ -दहा दिवसात प्रचाराचा प्रचंड धुरळा उडाला आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आदी दिग्गजांच्या सभा जिल्ह्यात झाल्या आहेत.

प्रचाराची आज सांगत होत असताना निवडणूक आयोगाने आता मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी सुरू केली आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 4,434 मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी एकूण 19 हजार 536 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचे एप्रिल आणि 3 मे रोजी प्रशिक्षण ही पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या तयारीचा थोडक्यात आढावा घेतल्यास मतदान प्रक्रियेसाठी 376 जीप गाड्या, 592 बसेस, 138009 खाजगी वाहने तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 4010 मतदान केंद्रे संवेदनाशील घोषित करण्यात आली आहेत. निवडणूक सुरळीत शांततेत पार पडावी यासाठी एकूण 4803 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 1354 जवान, राज्य राखीव दलाच्या 19 तुकड्या, आणि केंद्रीय राखीव दलाच्या 53 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.

 belgaum

निवडणुकी काळात कंट्रोल रूमकडे गेल्या शनिवारपर्यंत एकूण 2880 तक्रारी दाखल झाले असून 2468 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक कलमाखाली 1107 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गुंडा कायद्याखाली दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारचा प्रस्ताव असलेल्या 68 पैकी 45 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या शनिवारपर्यंत निवडणुकी संदर्भात 49 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.