Sunday, May 19, 2024

/

शिवजयंती मिरवणूक डाॅल्बीमुक्त करण्याचा मंडळांचा निर्णय;

 belgaum

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी 27 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या.

सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली.

हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने (Police Administration) योग्य ती खबरदारी घ्यायचे ठरवले आहे. शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत साजरा करावा, तसेच शिवचरित्र व प्रबोधनात्मक देखावे सादर करावेत. मंडळांनी परवानगी घेताना मागील नियमाचे पालन करा.Police

 belgaum

पोलिस आपल्यासोबत आहेत. उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करा, असे आवाहन श्री. पोलीस निरीक्षक प्रियकुमार पॉल यांनी केले.

बैठकीस यांची होती उपस्थिती शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव,रणजित पाटील विनायक बावडेकर, नगरसेवक राजू भातकांडे शिवाजी मंडोळकर रोहन जाधव अनंत बामणे,मेघन लगरकांडे , विजय जाधव, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.