बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जल्लोषी वातावरणात साजऱ्या होणाऱ्या, ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पोलीस बंदोबस्तासाठी विविध पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून शनिवार दि. २७ मे रोजी होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीसाठी विविध दलातील २२०० पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
बेळगाव शहरात उद्या शनिवार दि. 27 मे रोजी होणारी ऐतिहासिक श्री शिवजयंती मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तासाठी केएसआरपीच्या 14 तुकड्यांसह मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे.
शहरात उद्या काढण्यात येणाऱ्या श्री शिवजयंती मिरवणुक बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस प्रमुख /पोलीस उपायुक्त दर्जाचे 3 अधिकारी, उपजिल्हा पोलीस प्रमुख /सहाय्यक पोलीस उपायुक्त दर्जाचे 15 अधिकारी, सीपीआय /पीआय दर्जाचे 42 अधिकारी, 80 पोलीस उपनिरीक्षक 136 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
1500 हेडकॉन्स्टेबल /पोलीस कॉन्स्टेबल, 400 होमगार्ड्स, सीएआरच्या 8 तुकड्या, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाच्या (केएसआरपी) 14 तुकड्या आणि एएससी 2 तुकड्या असा फौजफाटा नियुक्त केला जाणार आहे.
याखेरीज नागरी वेशातील पोलिसांसह ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मिरवणुकीवर नजर असणार आहे.