Friday, April 26, 2024

/

शनिवारी फोन इन कार्यक्रमाचे आयोजन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पोलिस खाते तसेच इतर समस्यांबाबत काही तक्रारी असल्यास त्या सोडविण्यासाठी पाटील जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शनिवारी (ता. २६) फोन इन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सकाळी ९.०० ते ११.०० पर्यंत ०८३१-२४०५२२६ या क्रमांकावर तक्रारदार थेट जिल्हा पोलिसप्रमुखांशी फोनद्वारे संपर्क साधून तक्रारी मांडू शकतात.

ठाण्यात तुमची तक्रार स्वीकारत नाहीत, तुम्ही दिलेल्या तक्रारीची चौकशी होत नाही. तुमच्या भागात बीट पोलिस येत नाही, मटका, जुगार, क्रिकेट बेटिंगची माहिती देऊ शकता.

 belgaum

बेकायदा मद्यविक्री केली जाते, शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना सतावत आहे, बेकायदा वाळूतस्करी याव्यतिरिक्त अन्य माहिती देणाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबर गुप्त ठेवण्यात येतील. खोटी माहिती देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.