Sunday, May 19, 2024

/

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाला मोफत जलतरण प्रशिक्षण देणारे व्यक्तिमत्व

 belgaum

सध्या सुट्टीच्या निमित्ताने मुलांसाठी विविध उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र यासाठी पालकांना पैसे मोजावे लागतात. मात्र महाद्वार रोड येथील जलतरण प्रशिक्षक संजय विष्णू पाटील हे याला अपवाद आहेत. कारण ते मुलांना मोफत पोहण्यास शिकवतात. सध्या त्यांनी आपले प्रशिक्षण शिबिर सुरू केले असून निशुल्क जलतरण शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

उन्हाळा जवळ येऊ लागला की शाळांच्या वार्षिक परीक्षा होऊन उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते. या सुट्टीच्या काळात मुलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. जलतरण प्रशिक्षण शिबिर हे त्यापैकी एक होय. पूर्वी विहिरीवर अथवा तलावाच्या ठिकाणी पोहण्यास येणारे तज्ञ जलतरणपटू हौसेपोटी इतरांना होण्यास शिकवत असत. मात्र अलीकडच्या काळात होण्याच्या प्रशिक्षणाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पैसे मोजून सर्वच पालकांना आपल्या मुलांना अशा प्रशिक्षण शिबिरांमध्ये घालता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महाद्वार रोड येथील रहिवासी असलेल्या संजय विष्णू पाटील या पोहण्यात तरबेज हौशी जलतरणपटूने गेल्या 10 वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना पोहण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे.

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पैसे देऊन ज्यांना जलतरण प्रशिक्षण शिबिरात जाता येत नाही अशा पोहण्याची आवड असलेल्या मुलांना संजय अल्पावधीत पोहण्यामध्ये तरबेज करतात. संजय पाटील यांचे हे उन्हाळी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिर दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या तलावात सुरू आहे.Sanjay patil

 belgaum

यासंदर्भात बेळगाव live शी बोलताना संजय पाटील म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना मी कपिलेश्वर जुन्या तलावात मोफत पोहण्यास शिकवतो. वर्षभर दर रविवारी सकाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे एप्रिल -मे महिन्यामध्ये दररोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत मी मुलांना शिकवण्याचे काम करतो.

पाण्याची भीती दूर होऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी सुरुवातीला ट्यूब आणि बॉटलचा वापर करण्याद्वारे मी मुलांना पोहण्यास शिकवतो. आतापर्यंत असंख्य मुलांना मी पाहण्यास शिकविले आहे गेल्याच वर्षी 40 मुले माझ्या हाताखाली होण्यास शिकली आहेत. सध्या दहा-पंधरा मुलांना आपण प्रशिक्षण देत असल्याचे सांगून ज्याना पोहणे शिकायची इच्छा आहे, त्यांनी कपिलेश्वर तलाव येथे सकाळी हजर राहून आपल्याला भेटावे, असे आवाहनही संजय पाटील (मो. क्र. 9880494657) यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.