Saturday, May 4, 2024

/

काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही : सिध्दरामय्यांचा विश्वास

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजप सरकारला जनता आता वैतागली आहे. जनतेमध्ये काँग्रेसची लाट असून जनतेला आता बदल हवा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.

प्रजा ध्वनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दौऱ्यानिमित्ताने आलेले सिद्धरामय्या यांनी सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. काँग्रेसने विचारपूर्वक उमेदवार निवडले असून येत्या दोन दिवसात उर्वरित मतदारांची यादीही जाहीर करण्यात येणार असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. उर्वरित उमेदवार निश्चित करण्यासाठी गुरुवारी बैठक पार पडली असून काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यताच नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाज सध्या आक्रमक झाला असून उमेदवारीबाबत लिंगायत समाजातील नेते संपर्कात आले नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देताना सांगितले. शिवाय बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेली प्रजा ध्वनी यात्रा अवकाळी पावसामुळे रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्या दुसऱ्या ठिकाणी प्रजा ध्वनी यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

 belgaum

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर अथणी मधील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, अशी चर्चा होत आहे. अचानक दुसऱ्या पक्षातील नेते निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करून उमेदवारी मिळवत आहेत यामुळे इतर इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, इच्छुक उमेदवारांशी आपण चर्चा करून निर्णय घेणार आहोत. बेळगाव उत्तर मतदार संघात आमदार अनिल बेनके यांना नाकारण्यात आलेल्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

राज्यातील जनता भाजपच्या भ्रष्ट कारभाराला, महागाईला आणि सत्ताधाऱ्यांना वैतागली असून भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच नव्हे तर याआधीच अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे ते म्हणाले. भाजपकडून कार्यकर्ते आणि नेत्यांचा वापर ‘युज अँड थ्रो’ प्रमाणे केला जात असल्याचा आरोप करत जनतेमध्ये काँग्रेसचे वारे वाहात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.