Sunday, November 24, 2024

/

समितीचा प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार हा बेळगाव live इफेक्ट

 belgaum

बेळगाव सहित सीमाभागातील प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने एकमेव उमेदवार द्यावा आणि मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकवून ठेवावे अशी सर्वसामान्य मराठी भाषिकांची मागणी होती. २०१८ च्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मराठी भाषिकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती.

हीच भावना घेऊन जळजळीत लिखाण करणाऱ्या बेळगाव live ने यावेळी प्रत्येक मतदारसंघात समितीचा एकमेव उमेदवार करण्यात मोठी भूमिका निभावली आहे. यामुळे आता बेळगाव live हे सीमाभागातील मराठी भाषिकांचे खरे ऑनलाईन मुखपत्र ठरले आहे.

समिती नेत्यांची वादग्रस्त भूमिका आणि त्याला तथाकथित मुखपत्रांचा मुक पाठींबा या गोष्टी मनात सलत होत्या. मराठी अर्थात समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असताना राष्ट्रीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना पोषक होईल असे वातावरण तयार केले जात होते.

अशावेळी समिती नेत्यांना आपल्या लढयाची, मूळ कर्तव्याची आणि मतदारांच्या भावनेची जाणीव करून देण्याची गरज होती. ही जाणीव निर्माण करून देण्याचे काम अर्थात जबाबदारी बेळगाव live ने निभावली आहे. यामुळे समिती नेते अर्थात काही अपवाद वगळता भ्रष्ट प्रवरूत्तीच्या नेत्यांना चाप बसला आहे.

समिती म्हणजे आपल्या बापाची जहागीर आहे असे म्हणत आपण जे म्हणतो तेच खरे म्हणत आपल्या आर्थिक फायद्यासाठी समिती आणि मराठी भाषिकांच्या मतांचा दुरुपयोग याही निवडणुकीत करणाऱ्याचा दुष्ट हेतू उधळला गेला आहे.

आता खरी गरज आहे अशा प्रवरुत्तींची कारस्थाने रोखण्याची. आजपासून निवडणूक होइतोवर मराठी भाषिकांचा प्रत्येक मतदारसंघात विजय होईपर्यंत या तथाकथित नेत्यांची आगळीक रोखावी लागेल. आम्ही बारीक लक्ष ठेवणार आहोतच…. जनतेनेही हीच जबाबदारी बाळगावी आणि यात आम्हाला सहकार्य करावे ही इच्छा….

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.