गेल्या पंधरा दिवसांपासून शहर परिसरात तापमानाचा पारा वाढत असून आज शनिवारी 37 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्या अनुषंगाने एप्रिल महिन्यातील हवामानातील आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 60 टक्के आद्रता आज नोंद झाली आहे.
बेळगाव शहर परिसराचे आज शनिवारचे किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे.
आतापर्यंत बेळगावच्या इतिहासात एप्रिल महिन्यात यापूर्वी सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यापासून गेल्या 14 दिवसात कमाल तापमान सरासरी 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे.
अद्याप या महिन्याचे 15 दिवस बाकी असून उष्म्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. काल पडलेल्या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी पुढील दिवसात विशेष करून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्मा वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.