Friday, January 17, 2025

/

विजय मोरे यांना मिळणार भाजपाचे तिकीट?

 belgaum

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांना चितपट करण्यासाठी भाजपने नवी खेळी केली आहे. भाजपचे ग्रामीणचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक असताना समाजसेवेतील चेहरा आपला उमेदवार म्हणून पुढे आणण्याचा निर्णय भाजपने घेतला असून या कामी सर्वात महत्त्वाची भूमिका आरएसएसने घेतली आहे.

यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक म्हणून महापौर बनलेले आणि बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात सामील होण्याचा ठराव मांडून जगव्यापी झालेले माजी महापौर विजय मोरे यांचा चेहरा पुढे आणण्याचा विचार भाजपने सुरू केला आहे. अशी एक बातमी आहे.

काही कन्नड वाहिन्यांनी शुक्रवारी या संदर्भात वृत्त प्रसारित केले असून भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. या बातमी ने अनेक इच्छुकांना धडकी भरवली असून ही बातमी चर्चेची ठरली आहे. विजय मोरे हे एक उत्तम समाजसेवक आहेत.

समाजसेवेच्या क्षेत्रात मागील वीस वर्षापासून कार्यरत विजय मोरे यांनी आपला एक वेगळा ठसा आणि वेगळी छाप उमटवली आहे. शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची देशपातळीवर चर्चा आहे. याच बरोबरीने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार असो, एच आय व्ही बाधित रुग्णांना संजीवनी देण्याचे काम असो, विद्याआधार या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची भूमिका असो विजय मोरे सातत्याने अग्रेसर राहिले आहेत.

महापौर असताना बेळगावचा समावेश महाराष्ट्रात करावा. या प्रकारचा ठराव त्यांनी एकमताने मांडला. याबद्दल कन्नड संघटनांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि विजय मोरे जगविख्यात महापौर झाले. यानंतरच्या महापौरांनी अशी कृती केली नाही. 2008 साळी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिकिटाखाली लढवली मात्र त्यावेळी जातीपातीचे राजकारण करून त्यांचे नुकसान करण्यात आले.

त्यानंतर विजय मोरे यांनी राजकारणाला रामराम देऊन पूर्णपणे समाजकारण करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल आता भाजप पक्ष घेणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी एक आश्चर्याचा चेहरा म्हणून विजय मोरे यांना पुढे आणण्यात येणार असून भाजपने असा निर्णय घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा भाजपला होईल. अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.