बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे इच्छुक उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना मतदार संघातून सर्व ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे. आता बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी गुरुवारी रमाकांत कोंडुसकर यांच्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
रमाकांत कोंडुसकर यांनी बेळगाव दक्षिण मतदार संघात आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे. युवा वर्गासह अबाल वृद्धांत त्यांच्या विषयी आपुलकी आहे.
समस्या जाणून घेणे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास कार्यरत राहण्याचा त्यांचा गुण असून बेळगाव दक्षिण मतदार संघात रमाकांत कोंडुस्कर यांनाच उमेदवारी मिळावी अशी विनंती यावेळी प्रभाग दहाच्या नगरसेविका भातकांडे यांनी केली आहे.
निवड समिती सदस्य माजी नगरसेवक राजू बिरजे यांच्याकडे अर्ज देण्यात आला असून यावेळी संजय सातेरी रमेश माळवी मनोहर सांबरेकर, बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर बाबली महाराज,सिद्धार्थ भातकांडे,महादेव जाधव,प्रमोद चौगुलेआदी उपस्थित होते.