Tuesday, April 30, 2024

/

समितीच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार : अमर येळ्ळूरकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उत्तर मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांसाठी आज जनमत घेण्यात आले. निवड कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि जनमत अशा निकषावर आधारित उत्तर मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. अमर येळ्ळूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, उत्तर मतदार संघातून समितीला विजयी करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मतदार संघातील जनतेला आपल्याला कौल दिला असून जनतेला समितीच्या विजयाची इच्छा आहे. निवड समितीने पारदर्शक पद्धतीने उमेदवार निवडीचे कार्य केले असून आता सगळ्यांनी एक धैर्याने निवडणुकीला सामोरे जायचे आहे. यासाठी एकीची वज्रमूठ आवळून मराठीचे अस्तित्व अबाधित राखणे महत्वाचे असल्याचे येळ्ळूरकर म्हणाले.

उत्तर मतदार संघ हा बहुभाषिक मतदार संघ आहे. या मतदार संघात अनेक जाती-धर्माचे-भाषेचे लोक राहतात. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराचे मत समितीला मिळविण्याच्या दृष्टिकोनातून रणनीती आखण्याची गरज आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यामुळे लवकरात लवकर रणनीती आखून कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्व संपविण्यासाठी कर्नाटक सरकारने नव्या कन्नडसक्ती कायद्याचा घाट घातला असून या कायद्याला विरोध करण्यासाठी, विधानसभेत या कायद्याविरोधात आवाज उठविण्यासाठी सीमाभागातील प्रत्येक मतदार संघातून समितीचा उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे. यासाठी समितीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित येऊन वज्रमूठ आवळण्याचा गरज असल्याचे मत अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केले.

 belgaum

यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी निवड समितीने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत आपल्याला आनंद झाल्याचे सांगितले. उमेदवार कोण? यापेक्षा समितीला विजयी करणे हि काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निवड समितीने आज विविध कार्यक्षेत्रात जाऊन व्यापारी, युवक मंडळ, महिला मंडळ यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अशा एकूण ३१५ जणांचे जनमत घेतले. यामध्ये १९५ जणांनी अमर येळ्ळूरकर यांच्याबाजूने कौल दिला तर ८१ जणांनी शिवाजी मंडोळकर यांच्या बाजूने कौल दिला. तर ३३ जणांनी तटस्थ भूमिका घेतली. निवड कमिटीने या निकषावर अमर येळ्ळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली असून हा निर्णय सर्वानुमते संमतही करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.