Thursday, November 28, 2024

/

आचारसंहितेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती करणार : सिद्धरामय्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यातील सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि कंत्राटदारांकडून होणारी पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला विधानसभा

निवडणुकीची तारीख तात्काळ जाहीर करावी आणि राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू करावी, अशी विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. बेळगाव शहरातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असून राज्य निवडणूक आयुक्तांना भेटून यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका सादर करणार असल्याचे सिध्दरामय्यांनी सांगितले.

जनतेकडून कराच्या माध्यमातून घेण्यात आलेला आणि सरकारी यंत्रणेच्या पैशांचा निवडणूक प्रचारासाठी गैरवापर होत आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयांच्या पैशांचा दुरुपयोग जाहिरातींच्या माध्यमातून उधळला जात आहे. पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे.तर दुसरीकडे कंत्राटदारांकडून कमिशनची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आगामी निवडणुकीत भाजपाला पराभवाचा धोका आहे हे ओळखून भाजप आणखी एका ‘ऑपरेशन कमळ’ च्या तयारीत असून खंडणी, लाच, कमिशन, अधिकाऱ्यांचा गैरवापर, ठेकेदारांची पिळवणूक असे प्रकार सर्रास सुरु असलेले निदर्शनात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आणखी काही कंत्राटदारांनी आत्महत्या केल्यास नवल वाटणार नाही, असेही सिद्धरामय्या म्हणाले.Sidhramaya-cm

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत दिलेल्या सर्व निविदांची फेरतपासणी केली जाईल. लाच देऊन काढलेल्या निविदा रद्द केल्या जातील. त्यामुळे कमिशन तत्त्वावर कंत्राटे मिळवणाऱ्या कंत्राटदारांनी सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी भाजपवर निशाणा साधत भाजप जातीयवाद पसरवून राजकीय स्वार्थ साधत असल्याचा आरोपही सिध्दरामय्यांनी केला. पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याबाबत देखील त्यांनी टीका करत एका नववधूप्रमाणे पंतप्रधान दौरे आखात असून हि बाब त्यांच्या पदाला अशोभनीय असल्याचेही सिद्धरामय्या म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.