Friday, November 22, 2024

/

महिलादिनविशेष : रेल्वे तिकीट निरीक्षक बी. रुकसाना यांचा जीवनप्रवास…

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष/ महिला दिन विशेष : ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या हक्कांसाठी केलेल्या आंदोलनाचे प्रतीक असलेल्या या महिला दिनानिमित्त अनेक महिलांचा सन्मान, सत्कार केला जातो. तसे पाहता २१व्या शतकातही महिलांना म्हणावे तसे स्थान मिळालेले नाही, हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. परंतु आजही अशा अनेक कठोर प्रसंगांवर मात करून जिद्दीने यश गाठणाऱ्याही महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

तिकीट निरीक्षक हा रेल्वेच्या तिकीट तपासणी संस्थेचा एक महत्त्वाचा सदस्य असतो. अधिकृत तिकीटाशिवाय कोणतीही व्यक्ती ट्रेनमध्ये प्रवेश करणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी तिकीट निरीक्षकाची आहे. सार्वजनिक वाहतुकीवर असताना तिकीट तपासणे, पडताळणे आणि गोळा करून प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी तिकीट निरीक्षक जबाबदार असतात. त्यांच्या कर्तव्यांमध्ये प्रवासी कायदेशीररित्या प्रवास करत आहेत याची खात्री करणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करणे यांचा समावेश असतो. अशापद्धतीची कार्यपद्धती असणाऱ्या पदावर बी रुकसाना या गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत.

बेळगावमधील नानावाडी येथे राहणाऱ्या बी. रुकसाना याही अशा जिद्दी आणि मेहनती महिलांपैकी एक आहेत. गेली २५ वर्षे भारतीय रेल्वेमध्ये तिकीट निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या बी. रुकसाना रेल्वे विभागातील महत्वाच्या पदाची भूमिका पार पाडत आहेत. एकाचवेळी सर्वाधीक प्रवासी सामावून घेणाऱ्या रेल्वेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडण्यामध्ये तिकीट निरीक्षकाची भूमिका महत्वाची असते. रेल्वेमधून हर तऱ्हेचे प्रवासी दररोज प्रवास करतात. अशा प्रवाशांशी सौजन्यपुर्वक आणि वेळप्रसंगी तितक्याच कठोर पद्धतीने वागणाऱ्या बी. रुकसाना या त्यांच्या कामाच्या शैलीमुळे सर्वश्रुत आहेत.Ruksana b

बेळगाव, मिरज, लोंढा या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेमध्ये त्या १९९८ पासून कार्यरत असून आजवर त्यांच्या कामाच्या शैलीमुळे अनेक प्रवासी त्यांच्या चांगल्याच ओळखीचे झाले आहेत. प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, प्रवाशांसोबतचा संवाद यामुळे रेल्वेविभागाच्या उत्पन्नामध्ये भर घालण्यात त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे.

बेळगाव रेल्वे विभागात मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या बी रुकसाना यांनी आजवर अनेक नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईदेखील केली असून केवळ आपली नोकरीच चोखपणे बजावतात असे नाही तर कुटुंबाची जबाबदारी देखील त्या लीलया पार पाडतात. त्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलाचाही त्या सांभाळ करतात. नोकरी आणि कुटुंब सांभाळत त्यांनी समाजसेवेसाठीही पुढाकार घेतला आहे.Ruksana b

कोरोनाकाळात त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा धर्म पाळला आहे. अशाच तळागाळातील महिलांमुळे आज इतर महिलावर्गाला आदर्श मिळत आहेत. चार भिंतींच्या आत राहणाऱ्या महिलांना चारी दिशांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. बी. रुकसाना यांच्यासारख्या महिलांचा आदर्श प्रत्येक महिलांनी घेऊन आपल्या आयुष्यात भरारी मारावी, तरच महिला दिन सत्कारणी लागेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.