बेळगाव लाईव्ह : लिव्हर सिरोसीसचा आजार असलेल्या ३२ वर्षीय तरुणाला लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज असून यासाठी २२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या तरुणावर उपचार करणे कुटुंबियांना शक्य नाही. यामुळे या तरुणाला आर्थिक मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
चिकोडी तालुक्यातील करोशी येथील 32 वर्षीय तरुण बाजीराव सुळकुडे याचे लिव्हर निकामी झाले आहे. तो पान शॉपचा व्यवसाय करीत असून पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. तर मोठे भाऊ पत्रकार आहेत. मागील दोन वर्षांपासून बाजीराव लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहे. आजवर या तरुणावर चिकोडी, निपाणी व बेळगाव येथील अनेक इस्पितळात उपचार करण्यात आले असून उपचाराचा काहीच फायदा न होता वारंवार तब्येत बिघडत चालली आहे.
सध्या या तरुणावर बेळगाव के एल ई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार सुरू होते. दरम्यान, येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी बाजीराव सुळकुडे याचे लिव्हर निकामी झाले असून लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज असल्याचे सांगितले आहे. यासाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
बाजीराव सुळकुडे याची दिवसेंदिवस तब्येत खालावत असून लवकरात लवकर लिव्हर ट्रान्सप्लांटशन करण्याची गरज आहे. सदर व्यक्तीला आर्थिक मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती, संघ-संस्था, दानशूर नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मदतीसाठी-
फेडरल बँक खाते क्रमांक : 19390100033095
आयएफएससी कोड : FDRL0001939
किंवा 9632731806 या क्रमांकावर आपली आर्थिक मदत पाठवुन सहकार्य करावे.