Thursday, April 25, 2024

/

दुग्धाभिषेक सोहळ्याला मार्केट यार्ड व्यापारी बंधुंची भरीव देणगी

 belgaum

येळ्ळूर येथील राजहंस गडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी आज बुधवारी एपीएमसी मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने रोख रकमेसह गुळ, बटाटे, रवा, कांदे वगैरे महाप्रसादाच्या साहित्याची भरीव देणगी दिली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने येत्या रविवार दि 19 मार्च रोजी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार आहे. सदर सोहळ्याला एपीएमसी मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्यासह दुग्धाभिषेक सोहळा नियोजन समितीच्या सदस्यांनी आज मार्केट यार्ड येथे भेट दिली.

तेथील व्यापाऱ्यांनी या सर्वांचे सहर्ष स्वागत केले. तसेच सोहळा आयोजनाला हातभार म्हणून रोख रकमेसह गुळ, बटाटे, रवा, कांदे तसेच इतर काही साहित्य स्वेच्छेने आयोजक महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सुपूर्द केले.Market yard

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचा दुग्धाभिषेक भरीव देणगी देऊन नेहमीप्रमाणे समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात व लढ्यात आपला सहभाग असतो याही प्रचिती आज मार्केट यार्ड व्यापारी बंधुंनी आणून दिली. दुग्धाभिषेक सोहळ्यास बहुसंख्य व्यापारी बंधुनी सरळ हस्ते मदत केली. या खेरीज मार्केट यार्ड येथील व्यापारी कामगारांसह समस्त शेतकरी बांधवांनी येळ्ळूर गडावरील अर्थात राजहंस गडावरील दुग्धाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, ॲड. सुधीर चव्हाण, भागोजी पाटील, विकास कलघटगी, निंगाप्पा जाथव, आर. के. पाटील, डी. बी. मोहनगेकर, सुरेश राजूकर, महेश जुवेकर, पुंडलिक पावशे, व्यापारी बाळाराम पाटील, एन. बी. खांडेकर, एल. एस. होनगेकर, मोहन बेळगुंदकर, बसवंत माय्याणाचे, विश्वास घोरपडे, टी. एस. पाटील, संभाजी होनगेकर, कृष्णा बी. पाटील, राहुल होनगेकर, हेमंत पाटील, अभिजित मोरबाळे, योगेश होनगेकर, किरण जाधव आदी व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन माणिक होनगेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.