Tuesday, April 16, 2024

/

राहुल गांधी दौऱ्याची तयारी युद्धपातळीवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा २० मार्च रोजी बेळगाव दौरा ठरला आहे. युवा क्रांती मेळाव्याच्या या पार्श्वभूमीवर बेळगावमधील सीपीएड मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत आहे.

भव्य शामियाना आणि सुमारे २ लाख नागरिकांसाठी आसन व्यवस्था याठिकाणी करण्यात येत आहे. शनिवारी सकाळपासूनच काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यासह अनेक नेत्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. सतीश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांसमवेत थेट खाली बसून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला, त्यामुळे हि बाब आज विशेष चर्चेची ठरली.

काँग्रेसची भारतभर भारत जोडो यात्रा सुरु आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये येऊन राहुल गांधी सभा घेणार याची उत्सुकता काँग्रेस समर्थकांमध्ये लागली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काँग्रेसचे सर्व नेतेही या मेळाव्यास उपस्थिती दर्शविणार असून उमेदवार निश्चित होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Satish jarki

 belgaum

भारत जोडो यात्रेनंतर देशात प्रथमच बेळगावात राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असून या सभेच्या माध्यमातून बेळगावातून संपूर्ण राज्याला एक नवा संदेश ते देणार आहेत. हि सभा ऐतिहासिक ठरेल, अशी अपेक्षा सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे.

या सभेसाठी अद्याप प्रशासनाने परवानगी दिली नाही. शिवाय या दौऱ्याचा तपशीलही अद्याप आलेला नाही, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.