Friday, April 26, 2024

/

म. ए. समिती बैठक : उमेदवारी, पुनर्र्चना, राजहंसगडासह समिती बळकटीकरणाची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक तसेच राजहंसगडावरील मूर्ती शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक सोहळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मराठा मंदिर सभागृहात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीची वाटचाल खडतर परिस्थितीतून झाली आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी आपल्या ध्येयापासून मागे हटू नका, या काळात मतभेद होऊ शकतील, परंतु संघर्ष कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी, राजहंसगडावरील सोहळ्यासाठी यथाशक्ती सहकार्य करण्याची ग्वाही दिली. याचप्रमाणे सीमाभागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला रोखण्यासाठी आणि संकटांचा सामना करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवाराची निवड करण्यात यावी, अशी मागणी केली. समिती बळकटीकरणासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी उपाययोजना करावी, अशी प्रतिक्रिया कोंडुसकर यांनी व्यक्त केली.

 belgaum

यावेळी मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, बी. ओ. येतोजी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, दत्ता जाधव, मदन बामणे, महादेव पाटील, शिवराज पाटील, शिवानी पाटील, अहमद रेश्मी, मोतेश बारदेसकर, सागर पाटील, रणजित हावळानाचे, अनिल आमरोळे, श्रीकांत मांडेकर आदी कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. आगामी विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर प्रत्येक मतदार संघातून एकमेव उमेदवार जाहीर करावा.

उमेदवार निवड लवकरात लवकर करावी, जेणेकरून निवडणुकीची रणनीती ठरवून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यास सोपे जाईल आणि याचा लाभही होईल. सर्वानुमते समितीने उमेदवार जाहीर केल्यानंतर एकमेव उमेदवाराव्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही उमेदवारी जाहीर करू नये या प्रमुख आणि महत्वपूर्ण मागण्या बैठकीत करण्यात आल्या.Mes meeting

या बैठकीत, महाराष्ट्र एकीकरण समिती जो उमेदवार विधानसभेसाठी देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहून विजयश्री खेचून आणण्याचा याचप्रमाणे राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्धारही करण्यात आला.

या बैठकीला एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अ‍ॅड. रतन मासेकर, राकेश पलंगे, सुधा भातकांडे, दत्ता उघाडे, साधना पाटील, विकास कलघटगी, बाबू कोले, गुणवंत पाटील, श्रीधर खन्नूकर, अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, चंद्रकांत कोंडूसकर, अमित देसाई आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.