Sunday, January 12, 2025

/

बेळगाव हे कर्नाटकातील सर्वात प्रदूषित शहर

 belgaum

आयक्यूएअर या स्विस फर्मच्या काल मंगळवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार बेळगाव शहर 45.0 युजी/एम3 इतक्या पीएम 2.5 हवा गुणवत्ता वार्षिक सरासरीसह जगातील 7,323 शहरांमध्ये 159 व्या तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

काळजीची बाब ही आहे की आपल्या शहराच्या पीएम 2.5 सरासरीत तीव्र वाढ झाली आहे. कारण बेळगावची 2021 मध्ये 28.1 युजी/एम3 इतकी असणारी सरासरी आता सात -दहा पटीने वाढवून 45.0 झाली आहे.

जागतिक आरोग्य  संघटनेने ग्लोबल एक्यूआय इंडेक्सच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. जागतिक संस्थेने आता सार्वजनिक आरोग्य  लक्षात घेऊन मानके अधिक कडक केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, वार्षिक पीएम 2.5 ची सरासरी 5 युजी/एम3 असायला हवी.

दिल्ली हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले असून येथील हवा प्रदूषणाची पीएम 2.5 सरासरी 89.1 इतकी आहे. बेळगाव शहर हवा गुणवत्ता सरासरीत 2021 मध्ये चौथ्या क्रमांकावर होते, तर 2022 मध्ये राज्यातील शहरांच्या यादीत आघाडीवर होते. गेल्या 2021 मध्ये बेळगावची पीएम 2.5 वार्षिक सरासरी 28.1 इतकी होती जी जागतिक आरोग्य  संघटनेने ग्लोबल एक्यूआय इंडेक्सच्या मार्गदर्शक तत्वांच्या विहित मर्यादेपेक्षा 6 पटीने जास्त होती.

जागतिक आरोग्य  संघटनेने ग्लोबल एक्यूआय इंडेक्सची नवी मार्गदर्शक तत्त्वे गेल्या सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर केली. त्यानुसार सध्याची वार्षिक पीएम 2.5 ची सरासरी 10 युजी/एम3 ते 5 युजी/एम3 असायला हवी.

हवेतील सूक्ष्म कण प्रदूषणाला पीएम 2.5 म्हंटले जाते. जे आरोग्यासाठी अतिशय घातक समजले जाते. वाढत्या सूक्ष्म कण प्रदूषणामुळे दमा, अर्धांगवायू तसेच हृदय आणि फुफुसाचे आजार होऊ शकतात. पीएम 2.5 मुळे दरवर्षी जगातील लाखो लोकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते.

कर्नाटक राज्यात बेळगाव शहर हे 45 इतक्या पीएम 2.5 सरासरीसह सध्या पहिल्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. बेळगाव मागोमाग अनुक्रमे कलबुर्गी (37.7), नीलमंगला (33.7), अनगलपुरा (33.4), धारवाड (32.7), हुबळी (32.1), बेंगळूर (31.5) यांचा क्रमांक लागतो.

जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2022 मध्ये जाहीर करण्यात आला. या अहवालात जगातील 131 देशांमधील जवळपास 7300 शहरांची वर्गवारी करण्यात आली असून या शहरांना वार्षिक प्रति क्युबिक मीटर मायक्रोग्रॅम्स पीएम 2.5 च्या केंद्रीकरणाच्या आधारे मानांकन अर्थात क्रमांक देण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.