Wednesday, January 1, 2025

/

तुम्ही सिमावांसियांच्या आदरास अपात्र ठरला

 belgaum

बेळगावात राजहंस गडावर दुसऱ्यांदा झालेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात सहभागी झाल्या बद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने संभाजी राजे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्राचा मजकूर खालील प्रमाणे आहे.

माननीय,
छत्रपती संभाजी राजे
कोल्हापूर

महोदय,
आपण रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला त्याबद्दल सीमा वासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाट्याकाट्या झेलत संघर्ष करत आला आहे, अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंस गडावर शिवमुर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती.

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला, प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतींच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार देशमुख यांनी जय कर्नाटक असे उद्गार काढले. आपण छत्रपतींचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमा वासियांच्या आदरास अपात्र ठरत आहात.

Sambhaji raje

मराठी माणसाच्या लढ्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडेआमचा आग्रह नाही ,पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावतील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतींच्या रयतेचा आहे., आपण त्यांचे पाईक मानले जाता तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे.

कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली, आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय ?अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारस आहोत त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत, आम्ही नक्कीच विजयी होणार आहे, तुम्ही आमच्या सोबत यावे ही श्री चरणी प्रार्थना.

कळावे.आपली

महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव

 belgaum

1 COMMENT

  1. He chatrapati shivaji maharajanche vaushaj navet khare vaushanj sataryache chatrapati udayanraje Bhosale he thet vaushaj aahet smbhaji rajen yani rayatesathi kay ke aahe he jahir karave aata kolhapuratil Thakare gat kay karnar te hi jahir vhave .phukatchi khasdarki milali ki asach honar .nivadanuk ladhava mhanav .shivasenene sadi umedavari dili nahi .Simabhagatil marathi manus lachar nahi.he dhyanat thevav. Jay Maharashtra .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.