Sunday, December 22, 2024

/

50 टक्के सूट… ऑफरमध्ये आणखी 15 दिवस वाढ

 belgaum

रहदारी नियमाचा भंग केल्याप्रकरणी ई-चलनाच्या स्वरूपात ठोठवण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत चक्क 50 टक्के सूट देण्याच्या राज्य सरकारच्या ऑफरमध्ये आज शनिवार 4 फेब्रुवारीपासून आणखी 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कर्नाटक राज्य सरकारच्या प्रादेशिक परिवहन खात्याच्या सचिव पुष्पा पी. व्ही. यांनी एका आदेशाद्वारे ही मुदतवाढ जारी केली आहे. बेळगाव शहरातील रहदारी नियमांचे भंग करणाऱ्या वाहनांमध्ये सर्वाधिक नियम भंग दुचाकी वाहनांकडून झाला असून याप्रकरणी एकूण 6.28 लाख गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्हे करणाऱ्या वाहनांमध्ये बेळगाव आरटीओ कार्यालय, गोकाक, चिक्कोडी, बैलहोंगल आणि शेजारील गोवा व महाराष्ट्र राज्य या ठिकाणच्या नोंदणीकृत वाहनांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश वाहनांच्या मालकाचा सदोष पत्ता आणि मोबाईल क्रमांकात झालेला बदल यामुळे 2018 ते 2023 या कालावधीत रहदारी नियम भंगासंदर्भातील दंडाचे ई -चलन अदा करण्यात आले असून संबंधित वाहन मालक -चालकांना दंडाच्या रकमेत 50 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. रहदारी नियम भंगाचा दंड प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. हेल्मेट -4.12 लाख गुन्हे, सिग्नल तोडणे -1.20 लाख गुन्हे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे -45245 गुन्हे आणि इतर 51205 गुन्हे. रहदारी नियम भंग करून दंडास पात्र ठरलेल्या वाहन चालकांना नोटीस बजावण्याबरोबरच ऑनलाइन स्मरणपत्र (रिमाइंडर) धाडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांना 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड झाला आहे, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून दंड भरण्याची विनंती करण्यात आली आहे. रहदारी नियम भंगाचा दंड झालेले वाहन मालक -चालक रहदारी दक्षिण कॅम्प पोलीस ठाण्यात अथवा कर्नाटक वन वेबसाईटद्वारे आपला दंड भरू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.