बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील पीएसआय विरोधात महिला पोलीस स्थानकात अत्याचाराच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगावमधील वायरलेस पोलीस सब इन्स्पेक्टर लालसाब अल्लसाब नदाफ (वय २८) पोलीस कार्यालयातील वायरलेस शाखेत कार्यरत आहेत.
त्यांच्याविरोधात हि तक्रार दाखल झाली असून जनगौडा यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास हाती घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि रामदुर्ग तालुक्यातील महिलेची बेळगाव पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या व्याप्तीत येणाऱ्या वायरलेस कार्यालयातील पीएसआय लालसाब अल्लसाब नदाफ यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. यानंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. दोघांनीही विवाहाचा निर्णय घेतला, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
याचप्रमाणे लालसाब अल्लसाब नदाफ यांनी सुभाष नगर येथे सदर महिलेला बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा बेंगळुरू येथे घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याचप्रमाणे सदर पीएसआय महिलेला आपली पत्नी असल्याचे सांगून उभयतांनी बॉण्ड देखील केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मागील १५ दिवसांपूर्वी लालसाब नदाफ यांचे मोठे बंधू महम्मद नदाफ यांना बोलावून सदर माहिती सांगण्यात आली. मात्र यावेळी लालसाब आजारी असल्याचे कारण देण्यात आले. महम्मद नदाफ यांच्यासमोरही विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र आपण त्या महिलेशी लग्न करणार नसल्याचे लालसाब यांनी सांगितले आणि त्यानंतर महिलेशी संपर्क साधने बंद केले.
१० फेब्रुवारी रोजी त्यांचा आणखी एक विवाह झाला असून आपल्याला फसविण्यात आल्याचा आरोप करत सदर महिलेने पीएसआय लालसाब नदाफ यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.