हिडकलच्या कच्च्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एमएस आणि जुन्या पीएससी पाईपलाईनला विविध ठिकाणी लक्षणीय गळती लागल्यामुळे येत्या शुक्रवार दि. 17 आणि शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 असे दोन दिवस शहर पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.
हिडकलच्या कच्च्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एमएस आणि जुन्या पीएससी पाईपलाईनला बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे. यापैकी प्रामुख्याने कुंदर्गी पंप हाऊस येथे लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम उद्या गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी युद्धपातळीवर हाती घेतले जाणार आहे. गळती दुरुस्ती प्रसंगी वापरण्यात येणारे सिमेंट पॅकिंग वाळण्यास 6 ते 8 तासाचा कालावधी लागणार असल्यामुळे कुंदर्गी पंपाऊस उद्या बंद ठेवले जाणार आहे. सदर दुरुस्तीच्या कारणास्तव शुक्रवार 17 व शनिवार 18 फेब्रुवारी असे दोन दिवस 24 तास पाणीपुरवठा असणाऱ्या विभागांसह संपूर्ण बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणारे भाग पुढील प्रमाणे आहेत.
दक्षिण विभाग : मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव. उत्तर विभाग : सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कपलेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, माळ मारुती एक्सटेंशन एरिया, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची, कॅम्प, हिंडाल्को फॅक्टरी, केएआयडीबी औद्योगिक वसाहत, डिफेन्स परिसर, सैनिकनगर, केएलई हॉस्पिटल आणि बीम्स हॉस्पिटल.