विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाकडून सर्वाधिक सुवर्णपदक मिळवणारे पहिल्या दहा क्रमांकाचे विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढील प्रमाणे आहेत.
1) मुरली एस. (18 सुवर्ण, सिव्हिल इंजिनिअरिंग बेंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीआयटी बेंगलोर, 2) कीर्ती एस. (8 सुवर्ण, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुरुंजी वेंकटरमण गौडा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सुल्लिया मंगळूर), 3) स्वाती एस. (7 सुवर्ण, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन ऑफ इंजीनियरिंग एसीएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेंगलोर),
4) सुश्मिता एस. व्ही. (7 सुवर्ण, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगलोर), 5) पूजा भास्कर (6 सुवर्ण, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग बीएनएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर) 6) अभिलाष एम. (4 सुवर्ण, आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर), 7) युविका रमेश बाबू (4 सुवर्ण, इन्फॉर्मेशन सायन्स अँड इंजीनियरिंग बेंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर), 8) हर्षवर्धिनी जे. (4 सुवर्ण, एमबीए आरएनएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर), 9) अर्जुन यु. के. (3 सुवर्ण, मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन बीएमएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगलोर), 10) संगीता जी.आर. (2 सुवर्ण, एम.टेक. युबीडीटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व्हिटीयू कॉन्स्टिट्यूट कॉलेज दावणगिरी.
अकराव्या क्रमांकावर बेळगावची साक्षी पाटील ही आहे. शहरातील डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी साक्षी जगन्नाथ पाटील हिने बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले आहे.
साक्षी मुळची कुची -कवठेमहांकाळ (महाराष्ट्र) येथील आहे. अभ्यासातील सातत्य, वाचन, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळेच मी सुवर्णपदक मिळवू शकले अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.