बेळगाव जिल्ह्याच्या नूतन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखपदी एम. वेणुगोपाल यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकतीच आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी यांच्या बदलीमुळे त्यांचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे नूतन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून गेल्या गुरुवारी एम. वेणुगोपाल यांनी पदभार स्वीकारला आहे.
तत्पूर्वी पोलीस मुख्यालयामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. वेणुगोपाल यांनी यापूर्वी बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, मंडया, कोडगू, लोकायुक्त, सीसीआरबी आणि गुप्तचर विभागातही सेवा बजावली आहे.
ते 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीश कुमार आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणुगोपाल यांनी चिक्कोडी तालुक्याचा दौरा देखील केला आहे.