Saturday, June 15, 2024

/

सांबरा आखाडा 12 फेब्रुवारी रोजी- पै.कार्तिक काटे – पै. सुदेश ठाकूरमध्ये प्रमुख लढत

 belgaum

सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थच्यावातीने रविवार दि 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे.प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे.

दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै.नागराज बसुडोणी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. श्रीमंत भोसले यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची लढत कर्नाटक केसरी पै. संगमेश बिरादार विरुद्ध पै.शुभम कोळेकर(ता. गंगावेस, कोल्हापूर)यांच्यात होणार आहे.

चौथी कुस्ती पै.कीर्तिकुमार( कंग्राळी खु ) वि पै. सुनील कवठेपिरान,पाचवी कुस्ती पै. विशाल शेळके(सांगली ) वि. पै.रोहित ( कंग्राळी खु ), सहावी कुस्ती पै. विक्रम (शिनोळी) वि पै. प्रताप ठाकूर(सांगली), सातवी कुस्ती पै. पवन चिकदिनकोप वि. पै. प्रेम ( कंग्राळी खु ), आठवी कुस्ती पै. कार्तिक इंगळगी वि. गुथाप्पा (दावणगेरी) नववी कुस्ती पै. प्रवीण (निलजी) वि. पै. महादेव दऱ्याण्णावर,

 belgaum

दहावी कुस्ती पै. हणमंत (गंधिगवाड) वि. पै. सुशांत ( कंग्राळी खु )अकरावी कुस्ती रुपेश (कोल्हापूर) वि पै. संकल्प ( कंग्राळी खु ) बारावी कुस्ती पै. दयानंद (शिरगांव ) वि पै. पंकज(चापगांव) यांच्यासह यांच्यासह 50 हून अधिक चटकदार कुस्त्या होणार आहेत. विमानतळ नाजिकच्या मैदानावर आखाडा निर्माण करण्यात येत आहे.

मैदान यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, पै नवीन पाटील, पै मुकुंद मुतगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, महेंद्र गोठे, कृष्णा जोई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, मोहन हरजी, शीतलकुमार तिप्पाण्णाचे, सिद्राई जाधव, नितीन चिंगळी, शिवाजी मालाई, प्रवीण ताडे, भुजंग धर्मोजी, यल्लाप्पा जोगानी यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य, गावकरी परिश्रम घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.