Saturday, April 27, 2024

/

मोरे पिता पुत्राची धाव जखमीच्या मदतीसाठी

 belgaum

जिथे जिथे मदतीची गरज आहे, तिथे देव स्वतः धाऊन येतो नाहीतर आपले दुत तरी पाठवतो असे म्हणतात ते काही खोटे नाही. आज बेळगावच्या मोरे पिता पुत्राने ते खरे करून दाखविले.

महामार्गावर अपघाताने जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेल्या एका जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी आपला प्रवास थांबवून ते धावले आणि तातडीची मदत मिळवून देण्यात आघाडी घेतली. अपघाताने जखमी झालेला आणि थरथरणारा तो जीवही यामुळे सुखावला.

पुणे बेंगळूर महामार्गावर रहदारी कोंडलेली. सिक्स लेन चे काम सुरू असल्याने संकेश्वर जवळ एका बाजूने गर्दी वाढलेली. दुपारी बाराच्या सुमारास याच गर्दीतून एक मोटारसाकलस्वार निघाला होता. समोरच्या ट्रक चा अंदाज आला नाही. अंदाज चुकला, ब्रेक दाबला गेला आणि मोटारसायकल थेट ट्रक च्या मागील भागात शिरली. ट्रक थांबली. संपूर्ण मोटारसायकल चा चुराडा झालेला. अखेर काहींनी त्याला ट्रक खालून बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला पण अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या. तात्काळ मदतीची गरज होती.

 belgaum

याचवेळी गर्दीतून वाट काढत विजय मोरे यांची गाडी देवाने धाडल्या प्रमाणे घटनास्थळी दाखल झाली. कोल्हापूर येथे आपला पुत्र अलन मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष ममदापूर यांच्या सोबत ते गेले होते. तेथे सावली केयर सेंटर चा हॅप्पी स्ट्रीट हा कार्यक्रम संपवून ते परत येत होते. अपघात आणि रस्त्यावर पडलेला जखमी पाहून त्यांनी तात्काळ गाडीतून उतरत धाव घेतली. जखमीला धीर देऊन लगेचच रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि रस्त्यावर पडलेल्या त्या व्यक्तीला लवकरात लवकर उपचार मिळावेत याची सोयही करण्यात आली.Vijay more son

यावेळी तेथे दाखल झालेल्या पोलिसांनीही मोरे पिता पुत्राचे आभार मानले. विजय मोरे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा पुत्र अलन हा सुद्धा याकामात पुढे येत आहे. लवकर मदत झाल्याने महामार्गावर रोखली गेलेली वाहतूकही सुरळीत झाली. याबद्दल या दोघांचेही आभार अनेक वाहन चालकांनी मानले.

यासंदर्भात बोलताना विजय मोरे यांनी चांगला संदेश दिला आहे. अपघात घडतात. पण अनेकजण फक्त बघ्याची भूमिका घेत असतात. मात्र दोन मिनिटे थांबून आपण मदत केली तर एकाद्याचा जीव वाचू शकतो. असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.