प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी आज शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विक्रमी खटले सामंजस्याने निकालात काढण्यात आले.
प्रलंबित असलेल्या असंख्य खटल्यामुळे न्यायालयांवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते.
त्यानुसार आज शनिवारी सकाळी 10:30 वाजता शहरात आयोजित लोक अदालतीमध्ये चेक बाउन्स, कर्ज वसुली, फौजदारी, विद्युत बिल, विमा, बँक कर्ज यासह दिवाणी व कौटुंबिक वादांचे न्यायालयीन खटले सामंजस्याने तात्काळ निकालात काढण्यात आले.
बेळगावचे 9 व्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश माननीय शिरोळ यांच्यासमोर विक्रमी संख्येने खटले निकालात निघण्यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे सहकार्य तसेच बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण ॲड. सुनील चौगुले आदी वकील मंडळींचे प्रयत्न कारणीभूत ठरले.