Friday, April 19, 2024

/

नवे डीसीपी शेखर तिक्कन्नावर यांनी हाती घेतली सूत्रे

 belgaum

बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त (डीसीपी) म्हणून शेखर एस. तिक्कन्नावर नियुक्ती करण्यात आली असून आज बुधवारी त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

कर्नाटक सरकारच्या गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी यांची बेळगाव येथून तडकाफडकी बेंगलोर शहर कमांड सेंटर उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.Rakesh tirkannavar

आता त्यांच्या जागी शेखर एस. तिक्कन्नावर हे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहणार आहेत.

 belgaum

डीसीपी तिक्कन्नावर यांनी बेळगावात रुजू होण्यापूर्वी म्हैसूरचे पोलीस अधीक्षक तसेच तेथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.