बेळगाव -अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी “चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2023 मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे . अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.
बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक डी. बी. पाटील फोटो स्टुडिओच्या दालनात घेण्यात आली . यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र पाटील होते .
या बैठकीत सर्वानुमते चौथे साहित्य संमेलन चार सत्रात घेण्याचे ठरविण्यात आले . पहिले सत्र ग्रंथ दिंडीने सुरुवात करून उद्घाटन व संमेलनाध्यक्ष भाषण , दुसरे सत्र – कथाकथन , तिसरे सत्र- कविसंमेलन व चौथे सत्र – मनोरंजनातून प्रबोधन या चार सत्राचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले .
हे बेळगाव नगरीतील साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी परिषद व मराठा मंदिर कार्यकारणी प्रयत्नशील आहे .
यावेळी परिषदचे जिल्हाध्यक्ष अॅड सुधीर चव्हाण , उपाध्यक्ष डी. बी. पाटील , सचिव रणजित चौगुले , संजय गुरव , अरुणा गोजे – पाटील , रोशनी हुंदरे , मनिषा नाडगौडा , संजिवनी खंडागळे , गीता घाडी , सविता वेसणे , नेत्रा मेणसे , स्मिता चिंचणीकर , स्मिता मेंडके यासह आदी उपस्थित होते .