केएसआरपी सातव्या बटालियनमध्ये सेवेत असलेल्या बेळगावच्या पोलिसाचा मृतदेह आज सोमवारी सकाळी मंगळूर नजीकच्या असाईगोळी येथील त्याच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला.
मयत 28 वर्षीय पोलिसाचे नांव विमलनाथ जैन (रा. बेळगाव) असे आहे. प्राथमिक तपासात विमलनाथ याने आत्महत्या केल्याचा कयास आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी आईचे निधन झाल्यानंतर तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने काल रात्री आत्महत्या केली असावी.
आज सोमवारी सकाळी ड्युटीवर जाण्याचा दिवस असताना विमलनाथचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला. याप्रकरणी कोनाजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.