Friday, April 26, 2024

/

विकासकाम लवकरच पूर्णत्वास : हिंडलगा ग्रा.पं. सदस्यांचा दावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून युद्धपातळीवर सुरु असलेली विकासकामे आणि या विकासकामांसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय या दोन्ही बाजू नेहमीच ‘बेळगाव लाईव्ह’ ने प्रकाशित केल्या आहेत. काल ‘बेळगाव लाईव्ह’वर हिंडलगा भागातील रस्ते कामकाजाविषयी तेथील स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून एक वृत्तांकन प्रकाशित करण्यात आले होते.

ज्यामध्ये हिंडलगा भागात येणाऱ्या डिफेन्स कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील रस्ते विकासकामांच्या त्रुटींबाबत आणि कामकाजाच्या निकृष्टतेबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

सदर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी संपर्क साधून सदर वृत्त चुकीचे असल्याचा दावा केला. यादरम्यान ‘बेळगाव लाईव्ह’ ने या भागाचा दौरा करून तेथील ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क साधला असता, सदर विकासकाम अजून पूर्ण झाले नसून अद्याप रस्त्याचे कामकाज अर्धवट स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात अनेक वर्षांपासून रस्ते नव्हते. यामुळे प्राथमिक टप्प्यात रस्त्याचे कामकाज सुरु झाले असून अद्याप नळ आणि गॅसजोडणी शिल्लक असल्याने पुन्हा खोदकामाने रस्ता उखडेल यामुळे एकवेळ एक थर घालून रस्त्याचे कामकाज करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.Hindlga road works

 belgaum

अद्याप या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले नसून लवकरच हे कामकाज पूर्ण होऊन चांगल्या प्रतीचा रस्ता नागरिकांसाठी उपल्बध करून देण्यात येणार असल्याची माहिती हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, गजानन बांदेकर, मिरजकर आदींनी दिली.

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात याच भागातील रस्त्याच्या कामकाजाचे कंत्राट घेण्यात आले होते. मात्र कमिशन प्रकरणी झालेला गोंधळ आणि संतोष पाटील यांची आत्महत्या यामुळे या कामावर स्थगिती आणण्यात आली होती.

सध्या हे कामकाज पुन्हा सुरु करण्यात आले असून लवकरच नागरिकांसाठी चांगल्या प्रतीचे रस्ते बनवून तयार होतील, असे आश्वासनही ग्रामपंचायत सदस्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.