Wednesday, April 24, 2024

/

सरकारी शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खुशखबर!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील सरकारी शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुलभूत सुविधांसह चांगल्या पायाभूत सुविधांची दीर्घकाळापासूनच्या मागणीवर सरकारने विचार केला असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये राज्यातील सर्व सरकारी शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याकरिता ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुलांच्या हितासाठी १०० कोटी अनुदानातून बस योजना देखील राबविण्यात येत असून याचा लाभ ८ लाख विद्यार्थिनींना होण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे १९ लाख शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाहतूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ‘मक्कळ बस’ ही योजना जाहीर केली आहे. या माध्यमातून १०० कोटी रुपये खर्चून अतिरिक्त १००० वेळापत्रके रस्ते वाहतूक महामंडळांमार्फत चालविण्यात येणार असून याचा लाभ दरवर्षी अतिरिक्त २ लाख विद्यार्थ्यांना होण्याची अपेक्षा आहे.

२०२२ -२३ च्या अर्थसंकल्पात विवेक कार्यक्रमाची घोषणा केली होती ज्यामध्ये ११९४ कोटी रुपये खर्चून ७६०१ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याचा समावेश होता. चालू २०२३ -२४ च्या अर्थसंकल्पात, इतर विविध कार्यक्रमांतर्गत ३८२ कोटी रुपये खर्चून अतिरिक्त १९५५ खोल्या बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे १५७६ कोटी रुपये खर्चून एकूण ९५५६ वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. तसेच सर्व सरकारी प्रथम दर्जा महिला कॉलेज व पॉलिटेक्निकमध्ये योगध्यान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणासाठी मुख्यमंत्री विद्याशक्ती योजना देखील जारी करण्यात आली आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या 12 टक्के शिक्षण क्षेत्रासाठी देऊ केले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.