बेळगाव लाईव्ह : श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र, शांतीनगर, मंडळी रोड, टिळकवाडी, बेळगाव यांच्यावतीने श्री गजानन महाराजांचा 145 वा प्रगट दिन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी श्रींचा पालखी सोहळा होणार आहे.
या दिवशी सकाळी 6 वाजता काकड आरती, 7 वाजता अभिषेक, सामुदायिक पारायण, दुपारी 1 वाजता आरती, सायंकाळी ५ वाजता श्रींचा पालखी सोहळा अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री गजानन महाराज मंदिर, शांतीनगर, टिळकवाडी येथून पालखीची सुरुवात होऊन शिवाजी कॉलनी, महर्षी रोड या मार्गाने पुढे गजानन महाराज मंदिर, टिळकवाडी, शांतीनगर याठिकाणी पालखीची सांगता होणार आहे. त्यानंतर रात्री 8 वाजता श्रींची आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे.
याचप्रमाणे सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता श्रींची काकड आरती, 7 वाजता दुग्धाभिषेक, ७.30 वाजता सामुदायिक पारायण, 10 वाजता प्रवचन, 12 वाजता महाआरती, दुपारी साडेबारा ते तीन या दरम्यान महाप्रसाद व सायंकाळी 6 वाजता दैनंदिन उपासना होणार आहे.
सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती, 8 वाजता कीर्तन आणि त्यानंतर रात्री 10 वाजता शेजारतीने उत्सवाची सांगता होईल. या उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी उत्सवाचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ७८२९८०००३२, ९९०११९३७४७, ९४४८४२०८६०, ८६१८०३२१८५ या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन भक्त परिवार केंद्र, बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र, शांतीनगर, मंडळी रोड, टिळकवाडी, बेळगाव यांच्यावतीने श्री गजानन महाराजांचा 145 वा प्रगट दिन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी श्रींचा पालखी सोहळा होणार आहे. pic.twitter.com/1ggcEjw8sK
— Belgaumlive (@belgaumlive) February 9, 2023