एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे माध्यमिक शाळेसमोरील रस्त्यावर असलेले ड्रेनेजचे चेंबर दिवसेंदिवस धोकादायक बनत असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे माध्यमिक शाळेसमोरील जुन्या पी. बी. रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले ड्रेनेजचे चेंबर दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे.
कारण सदर चेंबरचे झाकण खचत चालले असून ते कोणत्याही क्षणी खाली कोसळून रस्त्यावर अचानक भगदाड पडण्याचा धोका आहे.
या रस्त्यावर जुन्या पी. बी. रोडकडे जाणाऱ्या असंख्य वाहनांची सतत रहदारी असते यात कांही अवजड वाहनेही असतात. या वाहनांमुळे या ड्रेनेजचे झाकण कोणत्याही क्षणी खचून खाली कोसळू शकते. या रस्त्यावर नागरिकांसह शाळेला जाणाऱ्या मुलांचीही ये -जा असते.
त्यामुळे अशावेळी या ड्रेनेज चेंबरमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.