बेळगाव लाईव्ह : शहरातील केळकर बाग परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ब्याकतील अटक करून २१,२५० रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी बेळगावमधील केळकर बाग परिसरात हा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भातील माहिती मिळताच खडेबाजार पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि
एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आनंद आदगोंड आणि इतर सहकाऱ्यांनी छापा टाकून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या साकिब इस्माईल मुल्ला (वय २४, रा. वीरभद्रनगर, बेळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याजवळ असणारे १४ ग्राम ४५० मिली वजनाचे २०,३०० रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि रोख ९५० रुपये असा एकूण २१,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस या प्रकरणी अधिक तपास घेत आहेत.